डॉक्टरांनी स्वतःला कायम विद्यार्थीच समजावे - डॉ. हिंमतराव बावस्कर

निलवसंत फाउंडेशनतर्फे पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रतिपादन
डॉक्टरांनी स्वतःला कायम विद्यार्थीच समजावे - डॉ. हिंमतराव बावस्कर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वैद्यकीय क्षेत्रात Medical Field काम करताना डॉक्टरने स्वतःला कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत स्वतःला समजावे. डॉक्टर Doctor हा कधीच निवृत्त होत नसतो. समाजास उपयोगी पडेल असे संशोधन त्याने वेळोवेळी करत राहावे, असे प्रतिपादन डॉ.हिंमतराव बावस्कर Dr. Himmatrao Bavaskar यांनी केले.

निलवसंत मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरतर्फे Nilavasant Medical Foundation and Research Center दिला जाणारा डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्कार Dr. Vasant Pawar Memorial Award डॉ. बावस्कर यांना रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. बावस्कर म्हणाले, आजच्या काळात अनेक आजार पुढ्यात येऊ लागले आहे. त्यावर उपचारपद्धती करण्यासाठी मूलभूत संशोधन होणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी त्यात वेळोवेळी पुढाकार घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात दररोज जगात नवनवीन संशोधन पुढे येत आहे आणि डॉक्टर हा सतत नेहमी विद्यार्थी सारखाच असल्याने त्याने याचा शोध घेत समाजपयोगी व मूलभूत संशोधन प्रत्येकाने करावे; संशोधनातून या आजारांवर उपाय आपणास मिळू शकतो. तसेच हे संशोधन आपल्यापुरते मर्यादीत न ठेवता ते आपल्या पुढील पिढीसही द्यायला हवे.

डॉ. बावस्कर यांनी करोना काळातील उपचार पद्धतीबाबत आपले अनुभव विशद करत प्रतिकार शक्ती, हायपोट्राईड, किडणी निकामी होणे, विंचू, सर्पदंश, यावर केलेले संशोधन, रूग्णावर केलेली उपचारपद्धती याबाबतही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पाहुणे म्हणून क.क.वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सुरेश पाटील, मविप्र संस्थेच्या निलिमाताई पवार, डॉ. प्रबोधिनी बावस्कर, वसंतराव खैरनार, डॉ. वसंत बेळे, रवींद्र मणियार, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. प्राची पवार, आर्कि. अमृता पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव खैरनार यांनी केले. यावेळी प्र.द. कुलकर्णी, शशीकांत जाधव, डॉ. व्ही.बी.गायकवाड, प्रणव पवार, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, रवींद्र मणियार, विजय कोठारी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com