डॉक्टरांच्या काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

डॉक्टरांच्या काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंडियन रेड क्रॉस सोसायटी (Indian Red Cross Society), नाशिक शाखा आणि विश्वास को ऑपरेटिव्ह बँक लि. (Vishwas Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी संमेलनानिमित्त (Marathi sahitya sammelan) डॉक्टरांसाठी आयोजित खुल्या काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे...

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दौंड येथील डॉ. पराग पाथ्रूडकर यांनी पटकावले असून डॉ. उल्का कदम (वाई) आणि डॉ माधवी मुठाळ नाशिक यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी डॉ. सुमेधा हर्षे, अकोला आणि डॉ. समीर अहिरे नाशिक यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अभुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचे परीक्षण कवयित्री जयश्री वाघ यांनी केले.

करोनाविषयक सर्व नियम पाळून पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि संतोष हुदलीकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

पारितोषिक विजेत्यांचे ब्रिगे. अरविंद वर्टी, नाशिक रेडक्रॉस सचिव मेजर पी.एम. भगत, विश्वास बँकेचे अध्यक्ष व साहित्य संमेलन निमंत्रक विश्वास ठाकूर, स्पर्धेच्या संयोजक डॉ. प्रतिभा औंधकर, आणि रेडक्रॉस कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com