डॉक्टर कामगारांच्या दारी!

ईएसआय रुग्णालयाचा उपक्रम
डॉक्टर कामगारांच्या दारी!

सातपूर । प्रतिनिधी Satpur

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ईएसआय हॉस्पिटलच्या ESIC Hospital Admistration प्रशासनाने ‘डॉक्टर कामगारांच्या दारी’ हा उपक्रम Doctors at workers door step Campaign हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वैद्यकिय तपासणी थेट कारखाना अथवा आस्थापनांच्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे केली जाणार असून या माध्यमातून ईएसआय हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना State Workers Insurance Scheme सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब पूळाज यांनी संपूर्ण राज्यातील ईएसआय हॉस्पिटलच्या 40 वर्षावरील कामगारांसाठी आरोग्य शिबिर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिकमध्य ईएसआयच्या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रंटलाइन वर्कर म्हणून कामकाज करणार्या घंटागाडी सेवकांसह सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील Satpur & Ambad MIDC कारखान्यात तसेच ईएसआय हॉस्पिटलच्या सेवा दवाखान्यांमध्ये 40 वर्षापुढील कामगारांची सर्व प्रकारची तपासणी केली जात आहे.

या उपक्रमात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता दहेकर शिबिराचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. शिबिरात विविध तपासणी कामी फिजिशियन डॉ. समीर वैद्य, डॉ. ईशानी वैद्य, सर्जन डॉ. संदेश पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. साहिली खडें, आयुषचे डॉ. नूर आंबेकर, डॉ. तारिका वैद्य यांच्यासह नर्सेंस, लॅब टेक्निशियन आदींकडून तपासण्या करण्यात येत आहेत.

विविध कारखान्यांत व आस्थापनातआयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 500 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्यात प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण मोंठ्या प्रमाणात आढळून आले. तसेच कॅन्सरचे निदान करण्यासाठी खास मेमोग्राफी यंत्राद्वारे कामगारांचे स्क्रिनिंग करण्यात आले. औद्योगिक वसाहतीतील अन्य कारखान्यांमध्ये देखील आमचे पथक जाणार असून, ज्या कारखाना व्यवस्थापनास कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबवायचे असेल त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील Medical Superintendent Dr. Rajshri Patil यांनी केले आहे.

विविध ठिकाणी तपासणी

ईएसआय हॉस्पिटल कैन्सर निदान तपासणी (30 कामगार), सातपूर सेवा दवाखाना (69 कामगार), अंबड सेवा दवाखाना (66 कामगार), घंटागाडी कर्मचारी (53), डाटा मॅटीक अंबड ( 70 कामगार),ऋषभ होंडा (50),सुयश मेटाटेक अंबड (45 कामगार), एम.जी. इलेक्ट्रिका सातपूर (68 कामगार)

ईएसआय हॉस्पिटलच्या शिबिरात केलेल्या तपासणीमुळे अनेकांना आपल्या आाजाराची माहिती झाली. आजारावर योग्य वेळेत उपचार सूरू करता आल्याने गंभीर परिणाम टाळणे शक्य होणार आहे.

- डॉ. राजश्री पाटील, वैद्यकीय अधीक्षक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com