उपचारासाठी घरी आले नाही म्हणून डॉक्टर दाम्पत्यास मारहाण

उपचारासाठी घरी आले नाही म्हणून डॉक्टर दाम्पत्यास मारहाण
देशदूत न्यूज अपडेट

इंदिरानगर | वार्ताहर

रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार न केल्याचा राग मनात धरून डॉक्टरला व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमोल सिंग परदेशी यांना पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कंबर दुखीचा त्रास जाणवु लागला त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना फोन करून घरी येण्यास सांगितले.

परंतु, कंबर दुखीचा आजार तातडीचा नसल्याने व संशयित हा नेहमी दारूच्या नशेत असल्याने डॉक्टर त्यांच्या घरी उपचारासाठी गेले नाही. या कारणावरून संशयित आरोपी परदेशी यांनी डॉक्टरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच कापून टाकीन, गोळ्या घालेन या प्रकारची धमकी दिली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या यांच्या पत्नी यांना देखील संशयिताने त्यांचा पंजाबी ड्रेस चा कुरता फाडून मारहाण केली स्त्रीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असेल कृत्य त्यांनी केले.

याप्रकरणी डॉक्टर यांच्या पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्यकीय सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यास प्रतिबंध नियम अधिनियम 2010 चे कलम 4 प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी बारेला पुढील तपास करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com