डॉक्टरांनी केली महिलेची फसवणूक

डॉक्टरांनी केली महिलेची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मेडिकल दुकानासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन डॉक्टरांनी 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना आडगाव परिसरात घडली.

याबाबत पुष्पा योगेश ठोके (Pushpa Yogesh Thoke) (वय 35, रा. आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जत्रा नांदूर लिंक रोड येथील मीना चंद्र अपार्टमेंटमध्ये मातोश्री मेडिकल आहे.

ठोके या मेडिकल (Medical) दुकानासाठी चांगल्या जागेच्या शोधात होत्या. त्यादरम्यान संशयित आरोपी डॉ. दिग्विजय प्रकाश अहिरराव (Dr. Digvijay Prakash Ahirrao) (वय 30, रा. आडगाव) व डॉ. राहुल सूर्यभान कांडेकर (Dr. Rahul Suryabhan Kandekar) (वय 35, हिंगणगाव, जि. अहमदनगर) यांनी ठोके यांच्याशी संपर्क साधला.

डॉक्टरांनी केली महिलेची फसवणूक
IPLवर कोरोनाचे सावट; 'या' दिग्गजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

त्यादरम्यान, या दोघा डॉक्टरांनी ठोके यांना मेडिकलसाठी जागा देण्याचे आमिष दाखविले, तसेच यासाठी गुंतवणूक करावयास सांगितले. त्यांनी विश्वास ठेवून ठोके यांनी दि. 1 नोव्हेंबर 2018 ते दि. 3 एप्रिल 2023 या कालावधीत वेळोवेळी सुमारे 12 लाख रुपयांची रक्कम दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही ठोके यांना जागा न देता 12 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाली. म्हणुन आडगाव पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांनी केली महिलेची फसवणूक
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com