'रेमडेसिविर' २५ हजारांना विकतांना डॉक्टरला अटक

पंचवटीतील घटना
'रेमडेसिविर' २५ हजारांना विकतांना डॉक्टरला अटक
USER

नाशिक । Nashik

रेमडेसीवर या इंजेक्शन साठी नातलगांची धावपळ सुरु असतानामात्र दुसरीकडे एक डॉक्टरच 'रेमडेसिविर'चा काळाबाजार करताना आढळून आला आहे. याप्रकरणी अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान मागील काही दिवसापसुन नाशकात बाधितांचा आकडा वाढत असून रेमडेसीवर इंजेक्शन चा काळाबाजार होताना दिसून येत आहे. करोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत असताना अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ.रवींद्र श्रीधर मुळक(40) यास पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान तक्रारदारास रेमडेसीवर आवश्यक असल्याने त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी मूलक यांनी तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. ५ हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएममध्ये जाऊन येतो असे सांगून तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल करत थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांचच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com