करोनानंतरही अशक्तपणा आहे? बातमी तुमच्यासाठी

करोनानंतरही अशक्तपणा आहे? बातमी तुमच्यासाठी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त (World Physiotherapy Day) बुधवारी (दि. ०८) रेडक्रॉस (Red Cross) येथे अस्थिरोग निदान, हाडांचा ठिसूळपणा (अस्थिघनता) तपासणी व करोनानंतर घ्यायच्या फिजिओथेरपीबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे...

इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक शाखा (Indian Red Cross Society Nashik Branch), मविप्रचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (MVP's College of Physiotherapy), इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट वूमेन्स सेल नाशिक (Indian Association of Physiotherapist Women's Cell Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रशांत भुतडा (dr. Prashant Bhutada) मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, कोविडनंतर होणाऱ्या विविध त्रासांवर उपयुक्त फिजिओथेरपीबाबत मार्गदर्शन केले जाईल. शिबिरात सहभागी रुग्णांवर रेडक्रॉस फिजिओथेरपी सेंटरमध्ये सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.

रेडक्रॉस सोसायटी येथे सकाळी १० ते १२.३० हे शिबिर होईल. शिबिरात रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रेडक्रॉस सोसायटी नाशिकचे सचिव मेजर पी. एम. भगत, रेडक्रॉस सोसायटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. दीप्ती वाधवा-देवरे, डॉ. पक्षा कांबळे, डॉ. क्षितिज कौशिक, डॉ. दीप देवधर, डॉ. सुरज मेंगाणे आदींनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com