Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

नाशिक | Nashik

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले आहे. समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर हे मंदिर आहे. तर मग जाणून घेऊयात सप्तशृंगी देवीचा इतिहास...

साडेतीन शक्तीपीठांना ॐ काराचे सगुण रूप मानतात. ओंकारात साडेतीन मात्रा आहेत. त्यातील ‘अ’कार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते. ‘उ’कार पीठ तुळजापूर, ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्वमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी. हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभनिशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते.

सप्तश्रृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते, असे म्हणतात. या ठिकाणी महिषासुराच्या शीराचे पूजनही केले जाते. लीळाचरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. राम आणि रावणाचे युद्ध झाले.

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला लक्ष्मण शक्ती लागली. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तश्रृंगी, असे म्हटले जाते. राम-सीतेने वनवासात येथील दर्शन घेतले. छत्रपती शिवरायही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख आहे.

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तश्रृंगी होय. देवीची मूर्ती स्वयंभू असून, ती आठ फूट उंच आहे. तिला अठराभुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते.

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
सप्तशृंगी मातेच्या अभिषेकाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे हे रमनीय ठिकाण आहे. गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com