उन्हाळ्यात व्यायाम करताय?

उन्हाळ्यात व्यायाम करताय?

नाशिक । शुभांगी तायडे Nashik | Shubhangi Tayde

व्यायाम (Exercise )म्हणजे एखाद्या झाडाला जशी नवी पालवी फुटावी तशी शारीरिक व मानसिक आनंददायी अवस्था. ती आपण कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत अनुभवू शकतो. व्यायाम करताना आपला गोल ठरवावा लागतो. त्याप्रमाणे व्यायाम कसा, किती आणि कोणता करायचा हे ठरतो. परंतु इथे आपण सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी व्यायामाचा विचार करणार आहोत.

प्रत्येक ऋतूमधील व्यायामाबरोबरच आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. कारण पेट्रोल असेल तर गाडी चालेल. तसेच गाडीचे मशीन चांगले असेल तर पेट्रोल आपण भरतो. त्याप्रमाणे व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी नाण्याच्या दोन बाजू आहेत.

उन्हाळा ऋतू ( Summer Season )

उन्हाळ्यात तुम्ही सगळे व्यायाम प्रकार करू शकता. पण या ऋतूत शरीराचे आणि बाहेरचे पण तापमान जास्त असते. त्यामुळे व्यायाम करताना मध्येमध्ये एक एक घोट पाणी प्यावे. कारण व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी झालेले असते.

उन्हाळ्यात व्यायाम करताना काही लोक ए.सी. किंवा फॅन ( AC/ Fan) लावून व्यायाम करतात. उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या पोषक आहार मिळत नाही. कारण आपलेही जेवण कमी झालेले असते. अशावेळी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा आणि आहारसुद्धा पोटाला हवा तेवढाच ठेवावा.

खरे तर शरीर आणि मन यांचा संयोग झाला तर किती खाल्ले पाहिजे आणि किती व्यायाम करावा याची सूचना आपले शरीरच आपल्याला देत असते. त्याचे ऐकले पाहिजे.

व्यायाम करून झाल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटले पाहिजे. अन्यथा व्यायाम केल्यावर खूप थकले असे वाटले तर ती जास्त दमणूक झाली असे होते.

आठवड्यातून चार दिवस व्यायाम करावा. महिलांनी तर करावाच. कारण ती सशक्त राहिली तर तिचे कुटुंब सशक्त राहील. कुटुंबाची शारीरिक, मानसिक स्थिती चांगली राहील. आपण काय मिळवले याचा आनंद राहील. कारण तीच असते तिच्या जीवनाची तसेच कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची शिल्पकार.

Related Stories

No stories found.