रस्त्याचे काम करा; अन्यथा गुन्हे दाखल करू - खा. गोडसे

रस्त्याचे काम करा; अन्यथा गुन्हे दाखल करू - खा. गोडसे

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक - सिन्नर महामार्गाची Nashik- Sinnar Highway खासदार हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी अपूर्ण रस्त्याची पाहणी करत संबंधित टोलवेज कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना करत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा खणखणीत इशारा खा. हेमंत गोडसे यांनी दिला आहे.

येत्या आठ दिवसात सव्हिस रोडचे कामे पूर्ण न केल्यास नव्व्या दिवसापासुन टोल शंभर टक्के फ्री करा करुन दिवाळी पर्यत काम पूर्ण न झाल्यास टोल सस्पेन्ड आदेश जारी करण्यात असे टोल प्रशासनाला ठणकावून सांगितले.

नाशिक - सिन्नर महामार्गावर गेली आठ - दहा दिवसांत जवळपास 6 ते 7 प्रवाशांचा जीव या रस्त्याने घेतल्याने अनेकांचे कुंटूंबातील कुटूंबकर्ता गेल्याने परिवार उध्द्वस्त झाली आहे. या सर्व घटनानां एकमेव रस्त्याची खड्डे, व अपूर्ण असलेले काम तसेच टोलवेज प्रशासनाचा दिरंगईपणा कारणीभूत आहे. सन 2017 पासून तर आजपर्यंत रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे आणि टोल वसुली मात्र रस्ता अपूर्ण असतानां देखील सुरुच आहे.

कोणतीही सुविधा उपलब्ध नसून केवळ पैसे वसुली सुरु ठेवली अजून किती प्रवाशांचा जीव टोल कंपनी घेणार? असा सवाल शिंदे,पळसे,चेहडी गावच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. नाशिक सिन्नर मार्गावर चार दिवसापूर्वीच पळसे गावच्या हेमंत कुमावत या तरुणाचा चेहडीच्या पडलेल्या खड्ड्यांनी जीव घेतला.मात्र घरातील एका आई बाप्पाचा मुलगा अपघातात गेला या अपघातग्रस्त कुंटूंबास प्रशासन काही मदतीचा हात देणार का ?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नाशिक सिन्नर महामार्गाच्या पाहणी दौर्‍यात राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एन. एस. पालवे, उपविभागीय अभियंता वाय.ए. पाटील व संपर्क अधिकारी सी.आर.सोनवणे यांनी टोल प्रशासनाचे प्रकल्प संचालक सुनिल भोसले यांना तातडीने रस्त्यांच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांचे गेलेले जीव या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन तातडीने रस्त्त्यांची दुरुस्ती करुन खड्यांची डागडूजी करावी अन्यथा टोल प्रशासनावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

या दौर्‍याप्रसंगी नगरसेवक बाजीराव भागवत, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान ताजनपुरे, नासाकाचे माजी चेअरमन तानाजी गायधनी, पळसेचे माजी सरपंच नवनाथ गायधनी, मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, अजित गायधनी, किरण चंद्रमोरे, किरण नरवडे यांनी शासकीय यंत्रणेसमोर सर्व्हिस रोडची झालेली दुरवस्था, बंद पडलेले पथदिप व मुख्यस्त्यांवर पडलेले खड्डे या समस्या निदर्शनास आणुन देत समस्या येत्या दोन चार दिवसांत न सुटल्यास टोल प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल करु असा इशारा खासदार हेमंत गोडसे समोर टोल प्रशासनाला दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com