पाणी निचर्‍यासाठी विशेष योजना आखण्याच्या सूचना

पाणी निचर्‍यासाठी विशेष योजना आखण्याच्या सूचना

नाशिक । प्रतिनिधी

महापौर सतीश कुलकर्णी यांनी ड्रेनेज व बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामांचा आढावा घेतला. पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा न होता त्याचा निचरा व्हावा, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना केल्या तसेच नागरिकांच्या तक्रारी येऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे आदेश दिले.

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सुनची सुरवात लवकर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात पावसाळापूर्व कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती, त्याअनुशंगाने पावसाळापूर्व झालेल्या कामांचा आढावा महापौरांनी ड्रेनेज व बांधकाम विभागाच्या कामांचा प्रगती आढावा घेतला.

शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचू नये, त्याचा योग्य पध्दतीने निचरा होण्यासाठी नियोजन करणे, नाल्यांची सफाई योग्य रितीने होत आहे की नाही याचा खुलासा जाणुन घेउन नागरिकांच्या तक्रारी येणार नाही अशा पध्दतीने काम झाले पाहिजे असे आदेश संबधीत खाते प्रमुख व त्या त्या विभागातील कार्यकारी व उप-अभियंता यांना महापौरांनी दिले.

शहर अभियंता यांनी शहरातील मोठया नाल्यांची साफ सफाईचे काम सुमारे 80 टक्के काम होत आले असून उर्वरीत काम येत्या लवकरच होणार असल्याची माहीती दिली.

भुयारी गटार योजना विभागाचे अधीक्षक अभियंता नलावडे यांनी सांगितले की विभागाकडे एक रोबोट मशिन मोठे नाले व नदी सफाईसाठी उपलब्ध असून शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबोट मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

त्याकरीता सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात नव्याने दोन रोबोट मशिन खरेदी करणेसाठी र.रु.10 कोटींची तरतुद धरणार असुन र.रु.25 कोटी नव्याने पावसाळी गटारीसाठी तरतुद धरण्यात येणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत शहर अभियंता संजय घुगे, अधिक्षक अभियंता भुगयो, संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता यु.डी. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com