पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया करून घ्या! असा होईल फायदा

पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया करून घ्या! असा होईल फायदा

वाजगाव | वार्ताहर

तालुक्यातील शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील बियाणे पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन देवळा मंडळ कृषी अधिकारी संजय वाघ यांनी केले आहे. शासनामार्फत बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी...

देवळा तालुक्यातील प्रत्येक गावांत ड्रायकोडर्मा, रायझोबियम, अॅझोयेबॅक्तर व पीएससी. या जैविक जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी व्यापक प्रमाणत जनजागृती कृषी विभाग यांचेकडून कृषी सहायक यांचेमार्फत गावपातळीवर करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील सर्व गावामध्ये बीजप्रक्रिया मोहीम राबवितांना विविध जैविक जीवाणू संवर्धकाचीमागणी संबधित कृषी सहायक यांचेकडे नोंदणी करावी.

बीजप्रक्रिया केल्याने पिकांना देण्यात येणारी रासायनिक खते सहज उपलब्ध होतात. बियाण्यांची अंकुरण क्षमता वाढते. बियाण्यावरील रोग पसरविनाऱ्या बुरशीचा वेळीच नायनाट होतो. पिकांची जमिनीतून अन्नद्रव्य खेचुन घेण्याची क्षमता वाढते. परिणामी झाडांची मुळे जोमदार वाढतात. याशिवाय उत्पादनात वाढ होते. तसेच पर्यावरणास उपयुक्त असल्याने जमिनीचे आरोग्यही सुधारते व पिकांवर येणाऱ्या रोगकिडी न आल्याने पिकावरील खर्च कमी होऊन उत्पाद खर्चात बचत होते असल्याचे वाघ यांनी सांगितले.

बीजप्रक्रिया केल्याने होणारा फायदा लक्षात घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी कृषी सहायक यांचेकडे विविध जैविक जीवाणू संवर्धकाचीमागणीसाठी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन देवळा मंडळ कृषी अधिकारी संजय वाघ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com