पद व सत्तेचा वापर स्वार्थासाठी नको

बंडु बच्छाव यांचे आवाहन
पद व सत्तेचा वापर स्वार्थासाठी नको

सटाणा । प्रतिनिधी Nashik

पद (post) व सत्तेचा उपयोग व्यक्तीगत स्वार्थाऐवजी (Personal selfishness) शेतकरी-कष्टकर्‍यांसाठी (farmers) झाला पाहिजे. मात्र तसे होत नसल्यामुळेच अनेक संस्था लयास गेल्या आहेत. संस्था मोठी होत असतांना तिच्या विस्तारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे घटक देखील मोठे होवून समाजात मानाचे स्थान मिळवतात.

त्यामुळे विकासकामांव्दारे शेतकरी बांधवांचे हित जोपासण्याचा बाजार समितीचा (market committee) उपक्रम निश्चित स्तुत्य असल्याचे प्रतिपादन बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांनी येथे बोलतांना केले. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (satana agricultural produce Market committee) आवारात सभागृह, कांदा लिलाव शेड, डाळिंब आवार प्लेव्हर ब्लॉक,

व्यापारी संकुल, शौचालय बांधकाम आदिंसह विविध विकासकामांचे लोकार्पण-भूमिपूजन (bhumipujan) बारा बलुतेदार संघटनेचे (bara balutedar sanghatna) संस्थापक बंडु बच्छाव (bandu bachav) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कृउबा सभापती संजय देवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य पप्पुतात्या बच्छाव, डॉ. शेषराव पाटील, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.

पद व सत्ता येत-जात असते. मात्र चांगल्या कामांमुळे समाजात मिळालेला सन्मान कधीही जाण्याची भिती नसते. दुर्दैवाने सत्ता व पदांचा उपयोग स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला जात असल्याने भ्रष्टाचार (corruption) वाढून विविध समस्यांचा सामना शेतकर्‍यांसह कष्टकरी जनतेस करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशावेळी शेतकरी, बाजार घटकांच्या हिताचा विचार करत विकासकामे पुर्ण करणार्‍या बाजार समितीचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याचे बच्छाव यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

सभापती संजय देवरे यांनी प्रास्ताविक करतांना बाजार समितीसाठी उत्पन्न वाढीचे श्रोत निर्माण करण्यासोबत सोलर पॅनलसारखे खर्च कमी करण्याचे उपाय देखील करण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत, आगामी काळात तालुक्यात डांगसौंदाणे येथे उपबाजार व लखमापूर येथील खरेदी-विक्री केंद्राची पक्रिया शासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. शेषराव पाटील, संचालक केशव मांडवडे, संजय सोनवणे, पिपळदर सरपंच संजय पवार आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसभापती मधुकर देवरे, प्रकाश देवरे, मंगला सोनवणे, वेणूबाई माळी, सरदारसिंग जाधव, प्रभाकर रौदळ, रत्नमाला सुर्यवंशी, संजय बिरारी, तुकाराम देशमुख, पंकज ठाकरे, सुनिता देवरे, जयप्रकाश सोनवणे, श्रीधर कोठावदे, नरेंद्र आहिरे, संदीप साळे, दिपक पगार, पांडुरंग सोनवणे, भिका सोनवणे आदिंसह तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, समितीचे सेवक, हमाल, मापारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले.

Related Stories

No stories found.