शेतीचा वीजपुरवठा तोडू नका

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश
शेतीचा वीजपुरवठा तोडू नका

येवला । प्रतिनिधी Yeola

येवला तालुक्याची (yeola taluka) शासकीय आढावा बैठक (review meeting) राम गीत मॅरेज हॉल मध्ये संपन्न झाली या आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar) यांनी तालुक्यातील विविध सरकारी अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसच महावितरणने (MSEDCL) शेतीचा वीज पुरवठा (Power supply) तोडू नये, असे आदेश दिला.

यावेळी कृषी विभाग (Department of Agriculture), महसूल विभाग (Department of Revenue), सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works), पंचायत समिती (panchayat samiti), नगरपालिका (Municipality), वनविभागच्या योजनांचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी सर्व अधिकार्‍यांना सांगितले की कोणाची अडवणूक करू नका सर्वसामान्यांना आपल्या विभागाकडे आल्यानंतर न्याय द्या.

प्रश्नांचे निवारण झाले पाहिजे, नाहीतर पुढच्या आढावा बैठकीत मला कारवाईचे आदेश द्यावे लागतील, अशी तंबी महावितरण अधिकार्‍यांंना देण्यात आली. शेतकर्‍यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महावितरणचे अधिकारी राजेश पाटील यांची भंबेरी उडाली, शेतकर्‍यांच्या विजेच्या प्रश्नासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी राजेश पाटील यांना सांगितले की शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन बंद करू नका,

येवला येथील उपजिल्हा रुग्णालय ही शोभेची वास्तू आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग नाही इथं मशिनरी नाही याकडे नागरिकांनी केंद्रीय मंत्री यांचं लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सागर चौधरी यांच्या मनमानी कारभाराचा देखील केंद्रीयमंत्री पवार यांनी समाचार घेतला. वन विभागाच्या समस्या गणेश गायकवाड यांंनी मांडल्या. तसेच प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या.

येवला शहरातील पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांची त्यांनी माहिती घेतली . तसेच सेनापती तात्या टोपे यांचे स्मारक येवला शहरा बाहेर झाल्याबद्दल व सध्या त्या स्मारकाची काय परिस्थिती आहे यासंदर्भात स्थानिक भाजप पदाधिकार्‍यां बरोबर बैठक लावण्याचे आदेश मंत्र्यांनी मुख्य अधिकार्‍यांना दिले.

या बैठकीसाठी प्रांतिक सदस्य बाबा डमाळे,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, तालुकाध्यक्ष डॉ,नंदकिशोर शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे,प्रमोद सस्कर,छाया क्षीरसागर,ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजू परदेशी,तालुका संघटन सरचिटणीस प्रा,नानासाहेब लहरे,शहर सरचिटणीस बापू गाडेकर, तालुका सरचिटणीस,दत्ता सानप,संतोष काटे, दिनेश परदेशी,गोरख खैरनार,अमोल शिंदे यांच्यासह भाजपच्या विविध विभागाचे प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com