नियमांच्या अधीन राहून डीजेला परवानगी: पालकमंत्री दादा भुसे

नियमांच्या अधीन राहून डीजेला परवानगी: पालकमंत्री दादा भुसे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शिवजन्मोत्सव (Shiv Janmatsav) साजरा करताना मिरवणुकीत (procession) डी.जे. (DJ) ला परवानगी राहणार नाही.

मात्र, ज्या ठिकाणी मंडळाचे देखावे राहणार आहेत, अशा ठिकाणी अटी व शर्ती (Terms and Conditions) तसेच नियमांच्या अधीन राहून डीजे लावण्यास परवानगी राहिल. मात्र, त्याचे डेसिबल नियमानुसार ठेवावे.

याबरोबरच शिव पालखीची मिरवणूक (procession) काढण्याबाबत स्थानिक पातळीवरून वरिष्ठ पातळीवर परवानगी मागवण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी दिले. पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (Collector's Office, Nashik) येथे शिवजन्मोत्सव मंडळाच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे (MP Hemat Godse), जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.), पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde), महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar), उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, पौर्णिमा चौघुले उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, महानगरपालिका पोलीस प्रशासन व इतर विभागाच्या शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी बैठका झाल्या असून संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत.

मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावेत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अखंडित वीज पुरवठा याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासन त्यांची जबाबदारी पार पाडणारा असून शिवप्रेमी शिवजन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनीही यावेळी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले. तत्पूर्वी शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बबलू परदेशी, बाबासाहेब राजवाडे, योगेश कापसे, देवेंद्र पाटील, योगेश गांगुर्डे, संदीप लभडे, कैलास देशमुख, आदींनी विविध सूचना करत विविध मागण्या केल्या.

यामध्ये शिवजन्म उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी. महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडून परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत विविध मागण्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. यामध्ये ड्रोनसाठी परवानगी मिळावी. पोलिस व सरकारी यंत्रणेने मिरवणूक मार्गावर व त्या काळात सजग रहावे. जे मिरवणूक काढणार नाही, त्या मंडळांना डीजे ची परवानगी द्यावी.

विविध प परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवावी. बॅनरला परवाणगी मिळत नाही ती मिळावी.परवानगीची रक्कम कमी करावी अथवा ही रक्कम घेऊच नये. पंचवटी कारंजावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या काळात वाहतूक मार्गात बदल करावा. शिवछत्रपती पालखी सोहळा हा शहरातील सुमारे दीडशे मंडळे एकत्र येऊन साजरा करणार आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन परवानगी द्यावी. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com