इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

नाशिक | Nashik

शहरातील आडगाव परिसरामध्ये (Adgaon Area) गरबा कार्यक्रमात (Garba Program) इलेक्ट्रिक शॉक (Electric Shock) लागून एका डीजे ऑपरेटरचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, पप्पू बेंडकुळे (Pappu Bendkule) असे डीजे ऑपरेटरचे नाव आहे. गेल्या नऊ दिवसांपासून जोरदार गरबा खेळाला जात होता. पंरतु काल शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

त्याचवेळी गरबा ऐन रंगात आला असतांना डीजे अचानक बंद पडल्याने सगळेजण डीजेकडे बघायला लागले. त्यावेळी स्पार्क झाल्याचा आवाज आल्याने डीजे ऑपरेटरचा मृत्यू (DJ Operator Death) झाल्याचे बोलेले जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com