350 शिक्षकांना दिवाळी भेट

मुख्याध्यापकपदी वर्णी लागणार
350 शिक्षकांना दिवाळी भेट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या Zilla Parishad Primary Teachers रखडलेल्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. यातून 350 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती Promotion मिळणार आहे . जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात या संदर्भात बुधवारी (दि.3) समुपदेशन पध्दतीने त्यांना नियुक्तीपत्र देऊन दिवाळी भेट दिली जाणार आहे.

दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती रखडली होती.जिल्ह्यात 3 हजार 263 प्राथमिक शाळा असून 11 हजार 989 शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही.यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी 10 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असेल त्यांना मुख्याध्यापकपदी बढती दिली जाणार आहे.

तसेच संगणक ज्ञान, अध्यापन कौशल्य आदींच्या आधारे त्यांना गुण दिले जाणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात येईल. पदोन्नतीपूर्वी या शिक्षकांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी साधारणत: 70 शिक्षकांना एका वेळी सभागृहात बोलवण्यात येईल. दिवसभरात 350 शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना दिवाळी भेट दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.