दिव्यांगांची दिवाळी खासदारांसोबत

दिव्यांगांची दिवाळी खासदारांसोबत

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

खा. हेमंत गोडसे (mp hemant godse) यांनी दिवाळीनिमित्त (diwali) आयोजित कार्यक्रमात भाषणबाजी बाजूला ठेवत थेट दिव्यांगांशी हितगुज करत त्यांना मिठाई वाटप (distribute sweets) केली. यावेळी दिव्यांगांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सातपूर-अंबड लिंकरोड (Satpur-Ambad Link Road) येथील सिद्धीविनायक मानसिक अपंग मुला-मुलींच्या (Mentally handicapped boys and girls) शाळेत खा. गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मुलांनी पर्यावरणपूरक दीपावली उत्सव (Eco-friendly Diwali celebration) साजरा केला. यावेळी नगरसेवक हर्षदा गायकर, संदीप गायकर, मधुकर जाधव, भागवत आरोटे, समीर शेटे, राजेंद्र कराड, योगेश जोशी,

संस्थेचे ट्रस्टी नीलेश धामणे, दिनेश भावरे, निखिल खोत, बाळासाहेब धामणे, गणेश सूर्यवंशी आदींसह पालक उपस्थित होते. यावेळी खा. गोडसे यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त करत थेट दिव्यांगांमध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारत मिठाईचे वाटप केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com