भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलमध्ये दिवाळी साजरी

भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलमध्ये दिवाळी साजरी

नाशिक । Nashik

भोसला मिलिटरी स्कुल गर्ल्स शाळेत दरवर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करण्यात आली.

या वर्षीची दिवाळी सीमेवरील सैनिक तसेच कोरोना योद्धा यांचे साहस वाढविण्यासाठी साजरी केली गेली . शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आली होती व शाळेची इमारत विविध पणत्या व आकाश कंदीलांनी सुशोभीत केली होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अंजली सक्सेना, शाळेचे समादेशक ब्रिगेडीयर एम.एम. मसूर ( विशेष सेवा मेडल ) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी झाल्याने भोसला मिलिटरी स्कुल गर्ल्स ही शाळा एक कुटुंब याची जाणीव उपस्थित असलेल्या सर्वाना झाली.

याप्रसंगी सी.एच.ई. सोसायटीच्या प्रशस्त आवार परिसरात मुख्याध्यापिका डॉ.अंजली सक्सेना, शाळेचे समादेशक यांनी श्रीराम मुर्तीचे पूजा केली व उपस्थित असलेल्या सर्वांनी विविध श्लोकांचे पठण केले.

त्यानंतर शिक्षकांनी रमा एकादशी पासून सुरु होणाऱ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती, प्रत्येक दिवसाचे महत्व व तो दिवस कशा पध्दतीने साजरा करावा याची माहिती देऊन तो दिवस साजरा करण्यात आला. या वर्षीची दिवाळी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने साजरी झाली.

शाळेच्या विदयार्थीनींनी व पालकांनी व शाळापालक मिलींद वैद्य शाळेच्या अध्यक्षा वसुधा कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका डॉ.अंजली सक्सेना, शाळेचे समादेशक ब्रिगेडीयर श्री.एम.एम. मसूर यांच्या मार्गदर्शानाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या साजरा झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com