विभागीय आयुक्त गमेंचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2021-22 पुरस्काराचे वितरण
विभागीय आयुक्त गमेंचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

नाशिक | Nashik

नाशिक विभागाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) 2021-2022 अभियानात सहभाग घेवून चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीत नाशिक विभागाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार (Award) प्राप्त केला आहे. आज मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांना पुरस्काराने (Award) सन्मानित करण्यात आले....

सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवंलब करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी ‘उभारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली बसवून ऊर्जेची बचत करीत पर्यावरणाचे संवर्धन, वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, कार्यालयास हरीत इमारतीचे प्रमाणपत्र, मोफत सातबारा उताऱ्याचे वाटप आदी कार्यक्रम राबविले होते. त्यासाठी त्यांना चार लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नाशिक विभागातून यांनी स्व‍िकारला पुरस्कार

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून शिफारस होणारे प्रस्तावांमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार आणि तृतीय पुरस्कार प्राप्त पंचायत समिती, राहता यांनाही 4 लाख रुपयाचा पुरस्कार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट कल्पना, शासकीय संस्था या गटातून प्रथम पुरस्कार प्राप्त तहसिल कार्यालय तळोदा, जि. नंदुरबार यांना रोख रु. 50 हजार आणि द्व‍ितीय पुरस्कार प्राप्त तहसिल कार्यालय नवापूर, जिल्हा नंदुरबार यांनी रोख रु. 30 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शासकीय अधिकारी या गटात अहमनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांना प्रथम क्रमांकाचे रोख रु. 50 हजार रुपयांचा पुरस्कार. तसेच जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Abhijit Raut) यांना द्व‍ितीय क्रमांकाचे रोख रु. 30 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शासकीय अधिकारी या गटात भडगांव नगरपरिषदेचे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अजय लोखंडे (Ajay Lokhande) यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रु. 50 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच तलाठी कार्यालय पारोळा येथील निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांना द्व‍ितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रु. 30 हजार रुपयांचा देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.