...अन् विभागीय आयुक्तांनीच काढले पालकमंत्र्यांसोबत आपल्या स्टाफचे फोटो...

...अन् विभागीय आयुक्तांनीच काढले पालकमंत्र्यांसोबत आपल्या स्टाफचे फोटो...

नाशिक | Nashik

करोना काळात (Covid Situation) सर्व काही बंद असतांना महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) न थांबता जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवले. याचा लेखाजोखा सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले...

मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर (Media Center BD Bhalekar Ground, infront of kalidas kalamandir Nashik) आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी' ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार किशोर दराडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, अपर आयुक्त (महसूल) भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, उपायुक्त (महसूल)गोरक्षनाथ गाडीलकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त भगवान वीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रवींद्र परदेशी, उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा‍ माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, माहिती सहायक जयश्री कोल्हे, किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, करोनासारख्या जागतिक संकटाच्या काळातही महाराष्ट्र थांबला नाही. राज्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. याचाच लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. 1 ते 5 मे 2022 पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नाशिक मधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने व शहरातील सर्व नागरिकांनी भेट देवून शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिककरांना केले आहे.

प्रदर्शनात दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती

मागील दोन वर्षातील कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, शालेय शिक्षण आदी विभागांची कामगिरी मोलाची राहिली आहे. यासह सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृहनिर्माण, वस्त्रोद्योग, महसूल, वन, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा, गृह, पर्यटन, पर्यावरण, कौशल्य विकास, मराठी भाषा आदी विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.

मध्यवर्ती ठिकाणी ‘माहिती व जनसंपर्क भवनाची’ उभारणी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकारांना अधिस्वीकृतीच्या माध्यमातून बस प्रवास, रेल्वे प्रवास यासारख्या सेवा उपलब्ध केल्या असून सध्या नाशिक विभागात 327 अधिस्वीकृतीधारक पत्रकार असून त्यातील सर्वाधिक म्हणजे 120 नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यात 44 वृत्तपत्रे शासनमान्य जाहिरात यादीवर आहेत. शासनाने नुकत्याच राज्यात सर्व जिल्हास्तरावर माहिती व जनसंपर्क भवन बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी त्याची उभारणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली.

‘तुमचा’ फोटो मी काढणार...

राज्यस्तरीय प्रदर्शनाच्यावेळी पालकमंत्री महोदयांसमवेत उपस्थित अधिकाऱ्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असलेले माहिती व जनसंपर्कचे छायाचित्रकार व कॅमेरामन फोटो पासून वंचित राहतील हे लक्षात येतांच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार व कॅमेरामन नेहमी आमचे फोटो काढतात. त्यामुळे विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी तत्परतेने कॅमेरा हातात घेवून माहिती कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यासमवेत फोटो घेतला. यानिमित्ताने त्यांची वेगळी प्रतिमा यावेळी उपस्थितांना पहावयास मिळाली.

Related Stories

No stories found.