देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर) :

नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्यातील गिरणारे हे बाजारपेठेचे गाव असून 50 खेड्यातील लोक येथे दररोज येत असतात येथील मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकून चॉकचे सुशोभीकरण केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे, यासाठी आ. सरोज आहिरे यांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गिरणारे येथील दत्त मंदिर ते वाडगाव ता रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते,दिवसेंदिवस ती वाढतच असल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढत आहे,

या शिवाय ता भागातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे असल्याने त्यातही आदिवासी भागातील शेतकरी व नागरीक यांना सतत संपर्क साधावा लागत असल्याने ता रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते,

तसेच वाडगाव, साडगाव, नाईकवाडी, लाडची, पारधीपाडा, करवंदेवाडी, कोचरगाव, विलवंडेवाडी, या गावासाठी हा रस्ता महत्वाचा घटक आहे, या रस्त्यावर दुभाजक टाकून चौकाचे सुशोभीकरण करणेसाठी भाजपचे नाशिक तालुका अध्यक्ष नितीन गायकर, सरपंच अलकाताई दिवे, अशोक थेटे, विष्णू थेटे, आधी सह ग्रामस्थ उपस्थित होते