का बंद पाडले आमदार फरांदे यांचे भाषण ?

का बंद पाडले आमदार फरांदे यांचे भाषण ?

नाशिक | Nashik

मागील महायुतीच्या कारकिर्दीत मराठा समाजासाठी चांगले काम केले, आत्ताच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, अशा आशयाच्या भाजपा आ. देवयानी फरांदे यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांंचे उपस्थित युवकांनी भाषण बंद पाडले.

यावेळी बैठकीत चांगलाच गोंधळ झाल्याने पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. तसेच आयोजकांनी हस्तक्षेप करीत गोंधळ शांत केला.

शहरातील औरंगाबादरोड भागातील वरद लक्ष्मी लॉन्स यासाठी आज (दि.१३) आरक्षणांसंसदर्भात मराठा समाजाच्या बैठकीत हा प्रकार घडला.

करण गायकर, राजु देसले, गणेश कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित आज मराठा समाजाची बैठक झाली. यात भाजपा आ. फरांदे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर मागील महायुतीच्या सरकारचे गुणगाण गाण्यास प्रारंभ केला.

राज्याच्या स्थापनेंनंतर इतिहासात प्रथमच मागील महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी चांगले काम केले. सारथी योजना, अण्णासाहेब पाटील महांमंडळ यासह अनेक योजना जाहीर केल्या आणि त्या लागु केल्या. योजना व विद्यार्थ्यांसाठी वतीगृह अशाप्रकारे विषय हाताळले.

कोट्यावधी रुपयांचा निधी महामंडळाला दिला. त्यांची व्याप्ती या सरकारने वाढून दिली नाही, सारथीची योजना बंद केल्याचे सांगत फरांदे यांनी मागील सरकाराचे कौतुक केल्यानंतर त्यास राजु देसले यांनी आ. फरांदे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मागील सरकारने काय केले ? हे सांगु नका, तुम्ही काय करणार? हे सांगा, असे देसले यांनी त्यांना विचारणा केल्यानंतर फरांदे यांनी भाषण सुरूच ठेवले. यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत आणि जोरदार घोषणाबाजी करीत आ. फरांदे यांचे भाषण बंद पाडले. यामुळे चांगलाच गोंधळ झाला.

यावेळी पोलीस व व कार्यकर्त्यानी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करीत गोंधळ थांबविला. त्यानंतर पुन्हा पदाधिकार्‍यांच्या भाषणाला सुरुवात झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com