जिल्हा शल्यचिकित्सक उद्या त्र्यंबक, हरसूल दौऱ्यावर

आरोग्य सुविधांची करणार पाहणी
जिल्हा शल्यचिकित्सक उद्या त्र्यंबक, हरसूल दौऱ्यावर

नाशिक । Nashik

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक यांच्या आदेशानुसार कोविड संसर्गाच्या पार्शवभूमीवर आदिवासी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे त्र्यंबकेश्वर तसेच पेठ, सुरगाणा व ंदिंडोरी या तालुक्यांचे दौरे करणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे गुरुवारी (दि. 13) रोजी त्रम्बकेश्वर तालुक्याचा तर 15 मेला पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात निदर्शनास येणार्‍या त्रुटी दूर करून आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न होणार आहे. गुरुवारी रोजी सकाळी 10 वाजता गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार आहेत.

साडे अकरा वाजता ग्रामीण रुग्णालय हरसुलला तर दुपारी एक वाजता उपजिल्हा रुग्णालय त्रम्बकेश्वर येथे भेट देणार आहेत. शनिवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता पेठ ग्रामीण रुग्णालय, दुपारी साडे बाराला ग्रामीण रुग्णालय बारहे येथे भेट देणार आहेत. दुपारी दोनला ग्रामीण रुग्णालय सुरगाणा, दुपारी चारला ग्रामीण रुग्णालय वणी आणि सायंकाळी साडे पाचला ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे भेट देणार आहेत.

या भेटींदरम्यान ते सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोविड व्यवस्थापन होतेय की नाही, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर, ऑक्सिजन ऑडीट, फायर ऑडीट, इलेक्टरीकल ऑडीट, कोविड खासगी हॉस्पिटल ऑडिट, नॉन कोविड व्यवस्थापन यांची पाहणी करून आढावा घेणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयाना भेटी देऊन वैद्यकीय सुविधेचा आढावा घ्यावा असे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक यांनी दिले होते. त्या अनुशनगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी दौरा सुरू केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com