नाशिक | प्रतिनिधी
एक पिढी पुस्तकापासुन दुरावली असली तरी भावी पिढी वाचविता येेणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत मुलांना वाचनाची आवड निर्माण केली पाहीजे. दोन तास त्यासाठी राखुन ठवले पाहीजे. शासन पातळीवरुन प्रोत्साहन दिले गेले पाहीजे. वाचनालयांनी शाळेत जाऊन वाचनाची आवड निर्माण केली पाहीजे. असे प्रतीपादन आज सावाना साहित्यीक मेळाव्याचे अध्यक्ष कवी नरेश महाजन यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ५४ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आज महाजन प्रकट मुलाखतीत बोलत होते. स्वानंद बेदरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. शनिवारी एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले होते. रविवारी दिवसभर मुलाखत,चर्चासत्र, सत्कार व सांंस्कृतीक कार्यक्रम झाले.
कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रकाश होळकर, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, धर्माजी बोडके, गिरीश नातू, संजय करंजकर, अॅड. अभिजित बगदे, जयप्रकाश जातेगावकर, देेवदत्त जोशी, सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, मंंगेश मालपाठक, प्रशांत जुन्नरे, जयेश बर्वे, सुरेश गायधनी आदी उपस्थित होते.
नरेश महाजन यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढण्याची गरज असल्याचे सांगितले. साहित्यातून विचार करण्याची दृष्टी मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी त्यानी गेल्या ५० वर्षातील साहीत्यीकांचे अनुभव कथन केले.वात्रटीका सादर केल्या.
तर, दुसऱ्या सत्रात सामाजीक जाणीवा अधीकच तिव्र झाल्या आहे का? यावर चर्चासत्र झाले. त्यात अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यशवंत पाटील होते. त्यात डॉ. चंद्रकांंत संंकलेचा, मंदार भारदे, डॅा.दिलीप धोंडगे, डॉ. प्रशांत भरवीरकर, डॉ. कुंदा बच्छाव सहभागी झाले होते. या चर्चासत्राचा सुर जाणीवा तिव्र होत असल्याकडे होता. मात्र जाणीवा, भावाना तीव्र होत असताना भावानांची चांगली जोपासानाही झाली पाहीजे. भावना चांगल्या असल्या तर हरकत नाही. मात्र त्यांना योग्य दिशा नसेल तर त्या भावना टोकदार होणे कोणाच्याही हिताचे ठरणार नाही. असे वक्त्यांनी स्पष्ट केले. रविंद्र मालुंंजकर यांंनी सुत्रसंचानल केले. भानुदास शौचे यांनी आभार मानले.
पुरस्कार वितरण
यावेळी अ. वा वर्टी कथा पुरस्कार स्मीता जोगळेकर, अॅड. संगीता पाटील यांना कवी गोविंद काव्य स्पर्धा पुरस्कार गंगाधर अष्टुरे, सुशीला संकलेचा, विजय भदाणे यांना चंद्रकांत महामीने विनोदी कथा पुरस्कार जयप्रकाश अमृतकर यांना, जयश्री पाठक कविता संग्रह पुरस्कार काशिनाथ महाजन यांना प्रदान करण्यात आला. विवेक उगलमुगले, विश्वास ठाकुर, तन्वी अमीत, प्रथमेश पाठक यांचाही यावेळी सत्कार झाला. सुरखा बोऱ्हाडे यांनी सुत्रसंंचालन केले.
सांस्कृतीक कार्यक्रमाने सांगता
सायंकाळी विद्याधर गीतरंग कर्याक्रमाने मेळाव्याची सांगता झाली.त्यात शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर, श्रीया सोंडुर, मयुर सुकाळे, निमीष कैकाडी, चंद्रशेखर बांंबर्डेकर, अदीय्त्य पाणवळकर यांनी कार्यक्र म सादर केला.सुरेश गायधनी यांनी आभार मानले.