कसबे सुकेणे ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

कसबे सुकेणे ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

येथील ग्रामपालिकेला महाआवास योजनेचा जिल्हास्तरीय सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार (District Level Beautiful Gram Panchayat Award) नुकताच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते सरपंच गीता गोतरणे, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे (Village Development Officer Ravi Ahire) यांचेकडे प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game), जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.), जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Z.P. Chief Executive Officer Leena Bansod),

उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी (Deputy Chief Executive Officer Pardeshi), ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचेसह आमदार व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण (flag hoisting) प्रसंगी प्रदान करण्यात आला. चालूवर्षी ग्रामपालिकेला तालुका व जिल्हा स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.

त्यातच आता जिल्हास्तरीय महाआवास योजनेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने कसबे सुकेणे (Kasbe Sukene) ग्रामपालिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच सरला धुळे (dhule), ग्रामसेवक रवी अहिरे, संचालक छगन जाधव, धनराज भंडारे, अवेदा सैय्यद अली, छबु काळे, सविता जाधव, बाळू कर्डक, छाया गांगुर्डे, शिल्पा जाधव, आरती कर्डक, अतुल पाटील, सुरेखा औसरकर, सोमनाथ भागवत, ज्योती भंडारे, सुहास भार्गवे, मनिषा भंडारे, रमेश जाधव आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com