जिल्हा मजूर संघ निवडणूक; माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न

मघारीसाठी सोमवारची अखेरची मुदत
जिल्हा मजूर संघ निवडणूक; माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाच्या (Nashik District Labor Cooperative Union) निवडणुकीचे (election) चित्र मघारीनंतर म्हणजेच गुरुवारी (दि.२४) स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला असून माघारीसाठी मोठी मुदत मिळाल्यामुळे तालुका गटातून बिनविरोध निवड (Uncontested choice) करण्यासाठी इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न जोमाने सुरू आहे.

निवडणूक (election) बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून सोमवारनंतरच पॅनल प्रमुखांकडून प्रयत्न सुरू होणार आहेत. उमेदवारांची भाऊगर्दी पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सध्या तरी कमीच वाटत आहे. मजूर संघाच्या २० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान (voting) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज व छाननीची प्रकिया पूर्ण होऊन गुरुवार, दि. २४ पर्यंत माघारीची मुदत आहे.

या काळात त्र्यंबकेश्वर तालुक्यातून (Trimbakeshwar Taluka) अशोक चव्हाण यांनी माघार घेतल्याने संपतराव सकाळे यांच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला असला तरी, अन्य तालुक्यांमध्ये मात्र इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्या त्या तालुक्याच्या आमदारांकडे इच्छुकांची फिल्डिंग लावण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com