जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : 'इतके' उमेदवारी अर्ज छाननीत बाद

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : 'इतके' उमेदवारी अर्ज छाननीत बाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन (Nashik District Labor Federation)संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता संचालक पदाच्या वीस जागांसाठी निवडणूक होत असून बुधवारी (दि.९) झालेल्या छाननीत 164 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले असून चार उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहे.गुरुवारी (दि. 10) सकाळी ११ वाजता फेडरेशनच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेशगिर महंत यांनी दिली.

फेडरेशनच्या संचालक पदाच्या तालुका प्रतिनिधीश राखीव 20 जागांसाठी या वेळी विक्रमी म्हणजेच 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली.यामध्ये काही जागांवर उमेदवारांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

त्यामुळे त्या त्या प्रवर्गातील संबंधित उमेदवारांचे एकापेक्षा अधिक दाखल अर्ज कमी करण्यात आले असून असे 53 उमेदवारी अर्ज आहेत.त्यामुळे  उर्वरित उमेदवारी अर्जांपैकी 164 उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.यामध्ये दाखले न जोडणे व इतर किरकोळ तांत्रिक  बाबी आहेत.  उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर असून त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com