जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांनी केले अर्ज दाखल

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक :  'इतक्या' उमेदवारांनी केले अर्ज दाखल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन (Nashik District Labor Federation Election) च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि.३) पर्यत २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.२३७ उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे.यामध्ये ज्येष्ठ नेते व माजी चेअरमन संपतराव सकाळे, दिनकर उगले,संभाजीराजे पवार, राजाभाऊ खेमनार,मुन्ना हिरे आदींचा समावेश आहे. बुधवार दि 9 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांच्या प्रतिनिधींसह ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त प्रत्येकी एक,महिला प्रवर्ग दोन अशा एकूण वीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख ठेकेदारांकडे मजूर संस्था आहे.त्यामुळे मजूर संस्थांच्या सहकारी संघाची निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक सुरेश महंत काम पाहत आहे.

यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे.सर्वसाधारण जागा - चांदवड - शिवाजी कासव, इगतपुरी - अरुण गायकर, नाशिक- अशोक म्हस्के, सिन्नर - दिनकर उगले, देवळा- सतीश सूर्यवंशी, दिंडोरी- प्रमोद मूळाणे, चांदवड- बाळासाहेब मावळे, येवला- संभाजीराव पवार, त्र्यंबकेश्वर- संपतराव सकाळे,नाशिक - योगेश हिरे,कळवण - योगेश पगार व रोहित कौतिक पगार.

अनुसूचित जाती - शरद काळे, महिला प्रतिनिधी- अनिता भामरे, अनुसूचित जाती- प्रवीण जाधव,भटक्या जाती विमुक्त जामाती- आप्पासाहेब दराडे, बंडूनाना भाबड व राजाभाऊ खेमनार. इतर मागासवर्ग - अर्जुन केरु चुंबळे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com