जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : निफाडमधून अमोल थोरे बिनविरोध

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : निफाडमधून अमोल थोरे बिनविरोध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या संचालक पदासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज माघारीनंतर आठ तालुका प्रतिनिधींचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे...

यामध्ये त्र्यंबकेश्वर, मालेगाव,कळवण, सटाणा, दिंडोरी, नांदगाव, चांदवड व इगतपुरी या तालुक्यांच्या पाठोपाठ निफाडमधून अमोल थोरे (Amol Thore) यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

निफाड सर्वसाधारण गटाची निवडणूक रंगतदार होऊन दुरंगी लढत होणार असे चित्र होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे (Pandharinath Thore) यांचे पुतणे अमोल थोरे (Amol Thore) व सुनील सोनवणे (Sunil Sonwane) यांच्यामध्ये सरळ लढत होणार असे चित्र होते.

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : निफाडमधून अमोल थोरे बिनविरोध
माझ्या करिअरला काही लोकांपासून धोका; प्रियांकाचा धक्कादायक खुलासा

सुनील सोनवणे यांना निफाडचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांचा पाठिंबा असल्याचे त्यांचे समर्थक सांगत होते. मात्र,पंढरीनाथ थोरे यांना आपला राजकीय अनुभव कामी आला.

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : निफाडमधून अमोल थोरे बिनविरोध
आई-मुलास बांधून ठेवत जबरी दरोडा; मारहाण करीत लुटला लाखोंचा ऐवज

थोरे यांनी आपल्या राजकीय अनुभवातून ही निवडणूक बिनविरोध कशी पार पडेल यासाठी सूत्रे हलवले. त्यामध्ये त्यांना यश आले आणि अमोल थोरे यांची बिनविरोध निवड पार पडली.

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : निफाडमधून अमोल थोरे बिनविरोध
महिलांनी कपडे घातले नाही तरी...; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com