बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घ्या!

बोर्डाची परीक्षा शाखानिहाय घ्या!

जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची मागणी

नाशिक | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच इंजिनिअरिंग मेडिकल व इतर कोर्सेससाठी गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय त्याची सिद्धता असणे गरजेचे आहे. पण बारावीची ही परीक्षा शाखानिहाय घ्यावी. म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्यावी, अशी मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा रवींद्र मोरे, सचिव प्रा. अनिल महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे...

आरोग्य संघटनेच्या मतानुसार अजून दोन-तीन महिने कोरोनाचा प्रवास राहू शकतो. शासन बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेणार आहे. दहावी व विद्यापीठाच्या परीक्षा रद्द केल्या.

तसेच बारावीची परीक्षा घेताना विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस कला शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवस असे पेपर घ्यावे. प्रश्नपत्रिकेचा एबीसी संच देऊन परीक्षा घ्यावी जेणेकरून गोपनीयता राहील.

वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असणारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त पंधराशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. एकाच दिवशी ही परीक्षा घेतल्यास विद्यार्थी एकाच वेळेस एकाच दिवशी परीक्षेस आल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.

सुपरव्हिजन करताना काही शिक्षक बाधित मिळून आल्यास प्रश्न निर्माण होईल. विषय डबल असेल तरी संच एबीसी ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची गोपनीयतादेखील राहील व कोरोनाचा फैलाव होणार नाही.

राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे यांच्याकडे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा. रवींद्र मोरे, सचिव प्रा. अनिल महाजन, प्रा. दीपक सूर्यवंशी, प्रा. रवींद्र शिरुडे, प्रा. सुनील शिरोळे आदींनी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com