राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची (Central Union of State Government Employees) बैठक महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस (General Secretary of the State of Maharashtra) विश्वास काटकर (Viswas Katkar) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nashik Collectorate) नियोजन भवन येथे घेण्यात आली.

एकूण 22 शासकीय विभाग एकत्रित असलेल्या या संघटनेत प्रत्येक विभागाचा एक पदाधिकारी असावा व सर्व विभागांना न्याय मिळावा, या उद्देशाने प्रत्येक विभागास एक पद देण्याचे विश्वास काटकर यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाच्या एका पदाधिका-याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संघटनेचे अध्यक्षपद महसूल विभागाकडे (Revenue Department) तर सरचिटणीसपद जलसंपदा विभागाकडे (Department of Water Resources) सोपविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करताना संघटना ही एका कुंटूबासारखी असावी, येथून पुढचा मुळ लढा जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) अंमलात आणण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत राहावे, असे ही विश्वास काटकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महसूल विभागाचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, राज्य सहकोषाध्याक्ष सुधाकर सुर्वे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे हे उपस्थित होते.

अशी आहे कार्यकारिणी - अध्यक्ष - दिनेश वाघ (महसूल विभाग), सरचिटणीस - सुनंदा जरांडे (जलसंपदा), कोषाध्यक्ष - गोविंदा लहामगे (वन विभाग), सहकोषाध्यक्ष - संतोष देवरे (वन विभाग), कार्याध्यक्ष - पूजा पवार (शासकीय रुग्णालय), विनय जाधव (धर्मदाय आयुक्त कार्यालय), उपाध्यक्ष (महिला) - अर्चना देवरे (महसुल विभाग), जगदीश घोडके (कोषागार कार्यालय), संजय जाधव-(आदिवासी विकास भवन ), प्रशांत रौंदळ- (वस्तु व सेवा कर विभाग), सहसचिव- निलेश गवळी (प्रादेशिक परिवहन विभाग), मिलिंद जगताप- (भुमी अभिलेख विभाग), गणेश पवार (शिक्षण विभाग),

रविंद्र पवार - तलाठी कार्यालय विभाग), जिल्हा संघटक - लता परदेशी (जिल्हा रुग्णालय), मनोज आहिरे - (माहिती व जनसंपर्क विभाग), अनिल बच्छाव (सहकार विभाग), मुकेश पाटील (मध्यवर्ती कारागृह विभाग), पंकज वाघ (जिल्हा रूग्णालय), जीजा गवळी (जलसंपदा विभाग), अंतर्गत हिशोब तपासणीस - राजेंद्र देशमाने (जिल्हा लेखापरीक्षण-सहकार विभाग ), कार्यालयीन सचिव - किशोर ठाकुर (औद्योगिक प्रशिक्षण विभाग), संपर्क प्रमुख - श्यामसुंदर जोशी (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), प्रसिद्धी प्रमुख - दिलीप पाटील (तंत्रज्ञान विभाग)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com