१५ वर्षांखालील मुलींसाठी जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी

१५ वर्षांखालील मुलींसाठी जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षांखालील मुलींसाठी राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असुन त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १५ वर्षांखालील मुलींची जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे.

यासाठी १ सप्टेंबर २००७ ते ३१ ऑगस्ट २००९ दरम्यान जन्मलेल्या खेळाडूंचा संघ तयार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक मुलींनी, क्रिकेट खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत मंगळवार १ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. तरी जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com