जिल्हा न्यायालय आठवडाभर बंद

उच्च न्यायालयाचे आदेश
जिल्हा न्यायालय आठवडाभर बंद
जिल्हा न्यायालय digi

नाशिक । Nashik

राज्यभरात वाढत्या करोना संसर्ग व जोडून आलेल्या सुट्ट्या या पार्श्वभूमिवर सर्व जिल्हा व सत्र न्यायालये तसेच प्रथम वर्ग न्यायालये आठ दिवस बंद राहणार आहेत.

18 एप्रिल नंतर न्यायालयिन कामकाजाबाबत निर्णय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन रजिस्टार यांनी परिपत्रक काढले आहे.

मागील वर्षी मार्च 2020 मधील लॉकडाऊन नंतर शिथिलता मिळाल्यानंतर अटी शर्तींमध्ये सुरू असलेले न्यायालयाचे कामकाज काही दिवसांपुर्वीच मार्चमध्ये न्यायालयीन कामकाज पुर्ववत सुरळीत सुरू झाले होते. तर 30 मार्च पासून पुन्हा ते दोन सत्रात सुरू करण्यात आले आहे.

करोना व लॉकडाऊन मुळे मागील वर्षभरात न्यायालयीन कामकाज अत्यल्प झाले आहे. तर चालू वर्षी अटी शर्तीत कामकाज सुरू झाले असले तरी त्यामध्ये गती नव्हती.

परिणामी मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित पडले असून याचा मोठा ताण न्यायालयीन व्यवस्थेवर पडत आहे. तसेच दुसरीकडे वकिल वर्गात कामकाजच होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक नव वकिलांना अर्थाजन नसल्याने मोठे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.

नाशिक जिल्हा वकिल संघटनेने अशा वकिलांना मागील वर्षी मदत केली होती. मात्र यंदा सर्वच संस्थांनी हात आखडते घेतले आहेत.

30 मार्चपासून सर्व न्यायालयांचे कामकाज प्रत्येकी अडीच तासांच्या दोन सत्रांमध्ये सुरू होते.

यात पहिले सत्र सकाळी 11 ते 1.30 आणि दुसरे सत्र 2 ते 4.30 या दरम्यान होते. संबंधित दिवशी ज्या केसची सुनावणी असेल त्यांच्याशी संबंधित वकील आणि पक्षकारांनाच न्यायालयीन परिसरात प्रवेश दिला जात होता तर इतर पक्षकारांना पूर्णपणे बंदी होती.

आता आठ दिवस न्यायालये बंद राहणार आहेत. तर राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्या पुढील काळातही न्यायालये बंदच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अशा आहेत सुट्ट्या

मंगळवारी व बुधवारी शासकीय सुट्टी असल्याने न्यायालयीन कामकाज बंद आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार दिनेश सुराणा यांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी व शुक्रवारी देखील सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने न्यायालयास सलग सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com