शहरासह जिल्हा काॅग्रेस पदाधिकारी नाना पटोलेंची घेणार भेट

शहरासह जिल्हा काॅग्रेस पदाधिकारी नाना पटोलेंची घेणार भेट

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाना पटोले यांनी काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्हानिहाय स्थानिक पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांची बैठक घेत आहे. शनिवारी (दि. ६) नाशिक शहर व जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या नेत्यांना बैठकीसाठी पटोले यांनी मुंबईत बोलावले आहे.

दुपारी अडिच ते साडेचार हा कालावधी नाशिकसाठी देण्यात आला असून स्थानिक पातळीवरिल पक्षाच्या व संघटनेचा आढावा ते घेणार आहेत. तसेच शहराध्यक्ष पदाबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

आगामी काळात डझनभर महापालिकांसह जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्यादृष्टीने नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कामाला लागले असून संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विभागवार मुंबईत बैठका लावल्या आहेत.

नाशिक शहर व जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या नेत्यांना त्यांनी शनिवारी दुपारी वेळ दिला असून गांधी भवन येथे बैठक होणार आहे. यावेळि सर्व फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने पक्षाची तयारी व ताकद यावर ते चर्चा करुन ते आढावा करणार आहेत.

तसेच पक्षातील संघटन बदलावर देखील आढावा घेण्याची शक्यता आहे. शरद आहेर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शहराध्यक्ष पद रिक्त आहे. या पदासाठी डझनभर इच्छुक रेस मध्ये आहेत. त्याबाबत इच्छुकांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील बैठकीत शहराध्यक्षाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईत होणार्‍या बैठकिसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केल्याचे समजते.

नाराज तक्रारिचा पाढा वाचणार

मागील काही काळात शहर व जिल्ह्यात काॅग्रेस कमकुवत होत असून निष्ठावंताना सातत्याने डावलले जात असल्याचा पक्षात सूर आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते भुजबळांपुढे काॅग्रेसचे नेते नमती भूमिका घेतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तुलनेत काॅग्रेसची अधोगती होत असल्याची निष्ठावंतांची खंत आहे. त्यामुळे काही पदाधिकारी ही नाराजी उघडपणे नाना पटोले यांच्यासमोर मांडण्याचि चिन्हे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com