जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या Nashik District Carrom Association वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संस्कृती फाऊंडेशन यांच्या सहकार्याने रविवार दि. 17 ऑक्टोबर रोजी 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटाच्या नाशिक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे District carrom competition आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सर्व गटाच्या एकेरी स्पर्धा होतील तर मुलासाठी आणि मुलींसाठी सर्व गट मिळून एकाच दुहेरी स्पर्धाचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धांना नाशिकच्या शिव छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील कॅरम प्रशिक्षण केंद्रात सकाळी 8. 30 वाजता सुरवात होईल.

सहभागी होणार्‍या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या तीनही गटात पहिले चार क्रमांक मिळविणार्‍या खेळाडूंना प्रावीण्य प्रमाणपत्र आणि आकर्षक पदक दिले जाणार आहेत. या स्पर्धेला सामाजिक कार्यकर्ते अभिषेक तांदळे यांचे सहकार्य लाभले आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव अशोक कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश सेनभक्त, अभिषेख मोहिते, भूषण भटाटे, नीरज कुर्‍हाडे, मेहुल चावरे, प्रथमेश ठाकरे, गायात्री वाघ, नेहा मनवर, नेहा वाळुंज, गायत्री चव्हाण, अमोल चांदवडकर प्रयत्नशील आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com