जिल्हा वकील संघ निवडणूक : 'पाहा' आतापर्यंतची आकडेवारी

जिल्हा वकील संघ निवडणूक : 'पाहा' आतापर्यंतची आकडेवारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीत रविवारी मतमोजणीच्या सकाळच्या पहिल्या सत्रात दोन जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात सहसचिव पूरूष व सहसचिव महिला गटाचा निर्णय तयार करण्यात येत आहे. निकाल एकत्रित जाहीर केला जाणार आहे. सविस्तर मतांची आकडेवारी वाचा...

मतमोजणीनंतर निवणूक अधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या मोजणीच्या आकडेवारीनुसार सहसचिवपदासाठी प्रवीण साळवे (309 मते), संजय गिते (1081 मते), शरद मोगल (1040 मते), चंद्रशेखर शिंदे (173 मते) तर 20 मते बाद ठरली. प्रथम दर्शनी मताधिक्यांच्या आधारावर अ‍ॅड. संजय गिते हे विजयी झालेले दिसून येत आहेत.

सहसचिव महिलांसाठी श्यामला दीक्षित (693 मते), सोनल कदम (392 मते), स्वप्ना राऊत (389 मते), सोनल गायकर (1186 मते) तर 20 मते बाद ठरली. प्रथम दर्शनी मताधिक्यांच्या आधारावर अ‍ॅड. सोनल गायकर या विजयी झालेले दिसून येत आहेत.

इतर जागांची मतमोजणी प्रक्रिया गतीमान झालेली आहे. सायंकाळी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक समितीचे अध्यक्ष बिपीन शिंगाडा यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतं पाटोळे, अतुल गर्गे, कविता शर्मा, दत्तात्रेय भोसले, अर्चना शिंदे, तेजस्वीनी शिंदे, उत्तम काकड आदी चोख कामगिरी पार पाडत आहेत.

Related Stories

No stories found.