जिल्हा बँकेने सक्तीची वसुली थांबवावी : बोराडे

जिल्हा बँकेने सक्तीची वसुली थांबवावी : बोराडे

कसबे | वार्ताहर | Kasbe

जिल्हा बँक (District Bank) संचालकांच्या वसुलीला (recovery) जर स्थगिती दिली जात असेल तर शेतकर्‍यांच्या (farmers) वसुलीला स्थगिती का दिली जात नाही

असा सवाल स्व. शरद जोशी प्रणित जिल्हा शेतकरी संघटनेच्या (District Farmers Association) वतीने सहकारमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे (memorandum) विचारला आहे. साहजिकच जिल्हा बँकेच्या थकित वसुली विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

सहकार मंत्र्यांना (Minister of Co-operation) निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने (central government) केलेली नोटबंदी (demonetisation) व मागील कोविड (corona) विषाणूमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान (crop damage) तसेच आत्ताची अतिवृष्टी (heavy rain) यामुळे सर्वच शेतीपिके वाया गेली आहे.

सततच्या संकटांमुळे शेतकर्‍यांची (farmers) सहनशक्ती संपली आहे. ज्या शेतकर्‍यांनी पिकविमा (crop insurance) काढलेला होता त्यांना विम्याचे हप्ते मिळाले नाही. शासन सतत शेतीमालावर निर्यातबंदी (Export ban) लावून व शेतीमाल आयात करून भाव हेतूपुरस्सर पाडीत आहेत.

या बाजारभावाने शेतकर्‍यांचा खर्च वसूल होत नाही. परिणामी शेतकरी (farmers) कर्जबाजारी होऊन हताश झाला आहे. त्यांच्या हातात पैसा आलेला नाही हे शासनाच्या लक्षात आल्याने शेतकर्‍यांना तुटपुंजी नुकसानभरपाई दिली आहे. आज शेतकरी नुकसानभरपाई (damege compensation) मागत आहे.

अशा परिस्थितीत सोसायटी व बँका कर्ज वसुलीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी जप्त करून त्यावर मूल्यांकन करण्यासाठी परवानगी मागून लिलाव करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागत आहे. ही शेतकर्‍यांसाठी गंभीर बाब आहे. त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नैराश्येतून शेतकरी आत्महत्या करीत आहे.

त्यामुळे शासनाने तत्काळ कोर्ट वसुलीच्या माध्यमातून कर्जवसूली थांबवावी. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतजमिनीचे मूल्यांकन करून जमिनी जप्त करून त्यानंतर होणारी लिलावाची प्रक्रिया थांबवावी. सध्या राष्ट्रीयकृत बँका मुद्दलाच्या 50 टक्के कर्जवसुली करीत आहे. अशा पद्धतीने जिल्हा बँकेने देखील राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याजात सूट देवून एकरकमी कर्ज संपूर्ण व्याज माफी द्यावी.

जिल्हा बँक मुद्दलाच्या चार पट व्याज लावुन वसूली करत आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून शेतकर्‍यांवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा त्याविरोधात शेतकरी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुका अध्यक्ष रामकृष्ण बोंबले, एकनाथ धनवटे, प्रदीप पवार, बाळासाहेब धुमाळ, भीमराव बोराडे, सुनील भंडारे, आनंदा गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com