जिल्हा बँकेची कर्जवसुली आता महिलांच्या हाती; दिंडोरीत पथक दाखल होताच खळबळ

जिल्हा बँकेची कर्जवसुली आता महिलांच्या हाती; दिंडोरीत पथक दाखल होताच खळबळ

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) शेतकऱ्यांना (Farmers) करोनाकाळात (Corona) गेल्या तीन हंगामापासून द्राक्षपिकाला (Grapes) कवडीमोल बाजारभाव मिळाल्यामुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे...

द्राक्षबागेचे साधे भांडवलही तीन वर्षांपासून निघाले नसल्यामुळे द्राक्षबागा अंगावर पोसण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. करोनाकाळात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे चित्र दिंडोरी तालुक्यासह महाराष्ट्रात (Maharashtra) पाहण्यास मिळत आहे.

मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेसह (NDCC Bank) अनेक बँकांकडून सक्तीची कर्जवसुली होत असल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे दिसत आहे. यासाठी शासनाने (Government) सर्व बँकांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.

दिंडोरी तालुक्यात सध्या जिल्हा बँकेमार्फत कर्ज वसुलीसाठी महिला कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सध्या द्राक्षाचा हंगामा चालू असून द्राक्षाला स्थानिक बाजारपेठेत भाव नसल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे संकट उभे राहिले आहे.

सध्या स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाला १५ ते २५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्यामुळे खर्च झालेले भांडवल सुध्दा मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. द्राक्षपिक हे संवेदनशील पिक आहे. यावर वातावरण बदलाचा त्वरित परिणाम होत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षपिकाला मोठ्या प्रमाणात भांडवल खर्च करावे लागत आहे.

बदलत्या वातावरणातून द्राक्षबागा सुखरूप बाहेर आल्या तर द्राक्षाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस यात शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अनेक संकटाना तोंड असताना बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव (Auction) होणार असतील तर शासनाने आधी शेतकऱ्यांना कृषीविषयक धोरण व पिकाला हमीभाव जाहीर करावा.

आज शेतकरी कर्जबाजारी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पिकाला हमीभाव नाही. पिकाचे उत्पादन घेवून पिंकाचे पैसे होत नसतील तर शेतकरी कर्जबाजारी होणारच यांत शंकाच नाही.

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा व पॉलीहाऊससाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेवून त्यामध्ये भाजीपाला व फुलाच्या लागवडी केल्या मात्र येथे सुध्दा उत्पादनापेक्षा खर्च जास्त होऊन उत्पन्न घट होताना दिसून आली. परिणामी पिकाला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे दिसून आले.

अनेक शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील शेती बंद केल्याचे दिसून आले आहे. नैसर्गिक आपत्ती व बाजारभाव न मिळाल्यामुळे शेती एक धोक्याच्या वळणावर उभी असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' आशी झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी झाले ते द्राक्षपिकामुळे कारण प्रत्येक वर्षी या ना त्या कारणामुळे या शेतीमध्ये फटका बसत राहिला व शेतकरी पुढील वर्षी द्राक्षाचे पैसे होतील या आशेवर राहिला.

द्राक्ष पिकाला प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्ती व बाजार भावाचा फटका बसत राहिला. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँका सोसायटीकडून घेतलेल्या कर्जचे हप्ते थकत गेले. त्यामुळे बळीराजाचे बँकांमधील पत संपुष्टात येवून शेतकरी प्रत्येक वर्षी कर्जबाजारी होत गेला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासनासह (Maharashtra Government) केंद्र सरकारने (Central Government) हस्तक्षेप करून बँकांकडून (Bank) होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवली पाहिजे, अशी मागणी (Demand) तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com