प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

सुरगाणा | वार्ताहर | Surgana

शेतकरी, कष्टकरी, आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी माकप आणि किसान सभेने नाशिकच्या दिंडोरी येथून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विधानभवनाला घेराव घालण्यासाठी लॉंग मार्च काढला होता.

या लॉंग मार्चची (Long March) दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते, त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या अनुदानात वाढ करत असल्याची घोषणा केली.

त्यानंतर शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी, जिल्हा प्रशासनाला (District Administration) सूचना देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector of Nashik Gangatharan D.) यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची तात्काळ अमंलबजावणी करण्यासाठी नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भेट देत, तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली.

प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
... म्हणून गोपीनाथ मुंडे 'लोकनेते' बिरूदाचे मुकुटमणी होते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येथील तहसिल कार्यालयात सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासंबंधी सुचना केल्या. यावेळी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलसंधारण आदी विभागाचे प्रमुख बैठकीत सहभागी झाले होते.

प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या समूहाने सुरगाणा तालुक्यातील औरंभे येथील वनपट्टे धारक शेतकरी शांताराम चौधरी, नारायण गायकवाड यांची भेट घेतली. तसेच घरकुल लाभार्थी ग्रामस्थ यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेनंतर अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
निफाड तालुक्यात गारपीट; पाहा Video

माजी आमदार जे. पी. गावित (Former MLA J. P. Gavit) यांच्या नेतुत्वाखाली मोर्चेकाऱ्यांनी वन जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, गायरान जमिनीवरील घरे नियमित करावी, वनहक्क दावे निकाली काढावेत आदि प्रमुख मागण्या केल्या होत्या.

बैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी खोबळा येथे पार नदीवर बांधण्यात आलेल्या जे.पी. पॅटर्न डॅम ची पाहणी केली. शेतकरी कसत असलेल्या वन पट्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. एका लाभार्थीचे घरकुलाची पाहणी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे (Project Officer Vishal Narwade), अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन भिमराव दराडे, सहायक वनसंरक्षक पूर्व विभागाचे हेमंत शेवाळे, पश्चिम विभागाचे पंकज गर्ग, मुख्यमंत्री यांचे सचिव सह तहसिलदार सचिन मुळीक, नायब तहसिलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com