निर्बंधांबाबत जिल्हा प्रशासन वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत

निर्बंधांबाबत जिल्हा प्रशासन वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या तिसऱ्या लाटेवर (Corona Third Wave) मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये (Nashik) रुग्णवाढ होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत...

आपण अजून 15 जानेवारीपर्यंत वाट पाहू, नंंतर मात्र रुग्णवाढ सुरूच राहिली तर मुंबईसारखे (Mumbai) कटू निर्णय घेण्याची वेळ येईल, असे सूतोवाच आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांंनी माध्यमांशी बोेलतांना केले. सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचची (Wait and watch) भूमिका प्रशासनान घेतली आहे.

मुंबईत (Mumbai) एकाच दिवसात 8063 नवीन करोना रुग्ण आढळून आले. नव्या व्हेरिएंटचा प्रसार समजण्यासाठी हे चित्र बोलके असल्याने त्यांनी नागरिकांना करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. लसीचे (Vaccine) कवच प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 4 हजार 844 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 831 रुग्णांवर उपचार सुरू आाहेत. आज 109 रग्ण बरे झाले. 322 रुग्णांची भर पडली. एकाचा मृत्यू झाला.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 32, बागलाण 15, चांदवड 05, देवळा 16, दिंडोरी 57, इगतपुरी 09, कळवण 00, मालेगाव 02, मालेगाव बाह्य-12 नांदगाव 07, निफाड 51, पेठ 00, सिन्नर 23, सुरगाणा 02, त्र्यंबकेश्वर 05, येवला 06 अशा एकूण 240 पॉझिटिव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महापालिका (Nashik NMC) क्षेत्रात 548 तर जिल्ह्याबाहेरील 33 रुग्ण असून असे एकूण 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये (Nashik Rurak) 97.18 टक्के, नाशिक शहरात 98.10 टक्के, मालेगावमध्ये (Malegaon) 97.12 टक्के तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97. 69 इतके आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com