जिल्हा प्रशासनाने गाठले महसूल वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट

जिल्हा प्रशासनाने गाठले महसूल वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा प्रशासनाने (District Administration) राज्य सरकारकडून (state government) मिळालेले वसुलीचे उद्दिष्ट सलग चौथ्या वर्षी फेब्रुवारी अखेरीसच पूर्ण केले आहे.

जिल्हा प्रशासनाला सन २०२२-२३ या वर्षासाठी १९३ कोटी ६६ लाखांचे महसूल उद्दिष्ट (Revenue objective) मिळाले असताना प्रशासनाने २०७ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपयांची महसूल वसुली (Revenue recovery) केली. राज्य सरकारद्वारे सर्व जिल्हा प्रशासनांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना एक महिना अगोदरच म्हणजेच फेब्रुवारीमध्येच ते गाठण्यात प्रशासकीय यंत्रना यशस्वी ठरली आहे.

जिल्हा प्रशासनाने सलग तीन वर्षांपासून शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. सिन्नरसारख्या (sinnar) तालुक्यात उद्दिष्टाच्या १४५ टक्के महसूल वसुली झाली आहे. मात्र,अनेक तालुक्यांमध्ये सरासरी ५० ते ६० टक्केच वसुली (recovery) होऊ शकली आहे. निफाड, चांदवडसारख्या काही तालुक्यांमध्ये तर वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते ते गाठताना स्थानिक यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. परंतु, अशा तालुक्यांतील अजूनही मार्च महिना असल्याने वसुलीची टक्केवारी निश्चित वाढणार आहे.

तालुकानिहाय महसूल वसुली पुढील प्रमाणे (टक्केवारीत)

 • नाशिक- ८६.२१

 • निफाड- १७.४९

 • सिन्नर-१४५.९१

 • दिंडोरी-९८.६२

 • पेठ-५६.४४

 • इगतपुरी-५४.१४

 • त्र्यंबकेश्वर-१३०.३१,

 • मालेगाव-४८.४०

 • येवला-६०.६१

 • नांदगाव-१३८.०

 • कळवण-६१.५८

 • सुरगाणा-६०.५६,

 • बागलाण-५६.३९

 • चांदवड-३४.०१

 • देवळा-६३.५२

एकूण - १०७.२१

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com