जि.प. गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे आज वितरण

जि.प. गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे आज वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ( Primary Education Department of Zilla Parishad) शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणार्‍या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण ( Teachers Award )आज (दि.16) दुपारी 12 वा. येथील प. सा. नाट्यगृहात करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली व बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

नरहरी झिरवाळ यांच्या विशेष उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील 15 पुरस्कारांसाठी यंदा 27 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते.

त्यापैकी कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ या 6 तालुक्यांमधून प्रत्येकी एक प्रस्ताव प्राप्त झाला तर सुरगाणा, देवळा, चांदवड, इगतपुरी, सिन्नर, येवला, दिंडोरी या 7 तालुक्यांमधून प्रत्येकी दोन प्रस्ताव शिक्षण विभागास प्राप्त झाले. निफाड तालुक्यातून तीन तर, नाशिक तालुक्यातून सर्वाधिक चार प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर निवड समितीने यातून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड केली. गट शिक्षणाधिकार्यांनी गट बदलून या शिक्षकांची निवड केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com