पाणी टंचाई भागात वॉटर व्हील ड्रमचे वाटप

 पाणी टंचाई भागात वॉटर व्हील ड्रमचे वाटप

खोकरविहीर । वार्ताहर Khokvihir

वेल्स ऑन व्हील्स (Wells on wheels )संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाझ मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्याकडून सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासी क्षेत्रात महिलांना डोक्यावर पाणी वाहण्याचा त्रास कमी व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पेठ तालुक्यातील जोगमोडी परिसरातील आमडोंगरा ( Aamdongra ) येथे 48 वॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.

पेठ तालुक्यात ( Peth Taluka ) पाणी टंचाई (Water scarcity )उन्हाळयात कायमस्वरूपी असल्याने गावातील परिसरात महिलाना पाणी दूरवर पाणी आणावे लागतं आहे. येथे पाण्यासाठी महिला कित्येक किमी लांबीचा प्रवास करावा लागतो. म्हणून गावातील महिला, पुरुष एकत्र येऊन ग्रामपंचायतीकडून एक विहीर खोदकाम करुन गावाला पाणी देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांचा प्रयत्न चालू आहे.

हिरामण महाले यांनी सतत जलपरिषद कार्यकर्ते देविदास कामडी यांच्या संर्पकात राहून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे व्यवस्थापक गभाले यांच्याकडे मागणी केल्यानंतर संस्थेने गावची वस्तूस्थिती पाहणी करण्यात आल्यावर वेल्स ऑन व्हील्स या संस्थेने आमडोंगरा गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रत्येकी कुटुंबांना 48 ड्रम वाटप करण्यात आले. ड्रम दिल्यानंतर मुली व महिलानी आनंद व्यक्त केला. गावोगावी जलपरिषद तर्फे देवीदास कामडी हे पाणी समस्याबाबत विविध संस्था कडे शासन स्तरावर पाठपुरावा गावाला जागृती करुन गावोगावी जलपरिषद मित्र एकत्र करून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यावेळी नारायण गभाले, अनुप मोरे, विजय देवरे, रुपेश काळे, वेणूबाई महाले, मिराबाई गायकवाड, जिजाबाई महाले, पारीबाई भोये , यशोदा भडांगे, हिरामण महाले, रोहिदास राऊत, जनार्धन गायकवाड ,जनार्धन चौधरी ,वामन महाले यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, महिला, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

माझे लग्न झाल्यापासून 25 वर्षे झाली. आजपर्यंत मी आणि अनेक महिला डोक्यावर हंडा घेउन पाणी घरी माणसांना, पाळीव प्राणी यांना पाणी वाहतच आहे. आज या ड्रममुळे काही प्रमाणात डोक्यावरील भार कमी होईल. हाच या संस्थेमुळे होणार आहे. सर्व गावातील महिलाना आनंद झाला आहे.

हौसाबाई रघुनाथ महाले

सतत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, सरकारी अधिकारी, जलपरिषद टीम, संस्था यांच्या संर्पकात असल्यामुळे गावात आज विहिरीचे काम सुरु असुन लवकरच शासन आमच्या गावाची पाणी टंचाई दूर करेल अशी अपेक्षा आहे. संस्थने ड्रम दिल्याबद्दल खुप आभारी आहे .

हिरामण महाले

Related Stories

No stories found.