वाकी खापरी धरणातून सिंचनासाठी पाणी वाटप

वाकी खापरी धरणातून सिंचनासाठी पाणी वाटप

घोटी । वार्ताहर Ghoti

जलसंपदा विभागाने ( Department of Water Resources ) वाकी खापरी धरणातून ( Waki ​​Khapri Dam ) कूर्णोली, वाकी, खंबाळे, आडवण, धार्णोली, कोरपगाव , शिंदेवाडी, घोटीवाडी या गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी (water for irrigation ) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणी वाटपाचा निर्णय नाशिक पाटबंंधारे विभागाची (Nashik Irrigation Department ) घोटी-खंबाळे विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदार हिरामण खोसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, बाळासाहेब गाढवे, भास्कर गुंजाळ, शाखा अभियंता सुरेश जाचक आदी उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील 20-25 गावांंना एप्रिल ते जुन महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. तेव्हा शेतीला पाणी कुठुन मिळणार असा प्रश्न निर्माण प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आला होता. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत घोटी खंबाळे विश्रामगृहावार आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते शेतकर्‍यांना पाणी परवानगी वाटप करण्यात आली आली.

दरम्यान दिव्यागं प्रहार संघटनेच्या पाणी परवानगी मागणीची राज्यमंत्री बचू कडू यांनी दखल घेत पाणी परवानगीसाठी त्यांनी पत्र दिले होते. यावेळी दिव्यांग प्रहार संघटनेचे नितीन गव्हाणे, सपन परदेशी, शेतकरी दत्तू कापसे, रमेश धांडे, तुकाराम वारघडे, विनोद नाठे, नारायण जाधव, निवृत्ती कतोरे, वामन शेलार, भगवान गणेशकर, शांताराम कोकणे आदी हजर होते.

परिसरातील शेतकर्‍यांना एक वर्षांसाठी पाणी परवानगी मिळणार आहे. तसेच यासाठी शेतकर्‍यांनी अर्ज भरून आमच्याकडे मागणी करावी.

- सुरेश जाचक, शाखा अभियंता

पाटबंधारे विभागाने शेतकरी बांधवांना पाणी परवानग्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी विज वितरण यांनी देखील शेतकरी बांधवांना विज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे.

- नितीन गव्हाणे, तालुकाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com