८० बालकांना वारकरी वेशभूषा साहित्याचे वाटप

८० बालकांना वारकरी वेशभूषा साहित्याचे वाटप

इगतपुरी । Igatpuri

वारकरी (warkari) परंपरेची कास धरून सन्मार्ग आणि संतांच्या विचारांची सांगड घालण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) नांदगाव सदो (Nandgaon Sado) येथील बाल वारकऱ्यांचे कार्य सुरु आहे.

भजन, कीर्तन, वादन, हरिपाठ, पारायण, वाचन आदी मार्गांनी परमेश्वराची सेवा हे बाल वारकरी करत असतात. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये सुसंस्कारांचे बीज पेरले जाते. ह्या बाल वारकऱ्यांना इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tahsildar Parmeshwar Kasule) यांच्या हस्ते वारकरी पद्धतीचे धोतर आणि शर्टसाठी कपडे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

इगतपुरी तहसील कार्यालयात आज हा छोटेखाणी कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी नांदगाव सदो येथील बाल वारकऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. एखाद्या वारकरी कार्यक्रमात मला वारकरी म्हणून बोलवा असा प्रेमळ आग्रह कासुळे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच तब्बल ८० बाल वारकऱ्यांना हे साहित्य वाटण्यात येणार असून प्रतिनिधिक स्वरूपात ह्या कार्यक्रमामध्ये ६ बाल वारकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.

दरम्यान, सिन्नर (Sinner) येथील हरदास गुरुजी, माणिकखांबचे माजी सरपंच हरीश चव्हाण, शिक्षक नेते निवृत्ती नाठे यांच्या साहाय्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भगत, सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com