बेरोजरागारांना फिरत्या विक्रीसाठी वाहन वितरण

बेरोजरागारांना फिरत्या विक्रीसाठी वाहन वितरण

येवला । प्रतिनिधी Yeola

येवला Yeola येथे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत CM Employment Generation Schemes व बँक ऑफ महाराष्ट्रच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्राचे वाहन वाटप पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनीषकुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबीर, समन्वयक सचिन पवार आदी उपस्थित होते.

करोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून 6 ते 10 लाख किमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किमतीच्या 5 टक्के रक्कम सुरुवातीला भरावी लागते. यावर शासनाची 15 टक्क्यांपासून 35 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते व कर्जाच्या रकमेची 5 वर्षांत परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पूजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिणी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, नीलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या 16 लाभार्थ्यांना मालवाहतूक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com