दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप; ‘या’ योजनांचा होणार लाभ

दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप; ‘या’ योजनांचा होणार लाभ
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रबोधिनी ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्यामंदिर या मानसिक दिव्यांग (mentally retarded) मुलांच्या शाळेत 127 दिव्यांगांना स्वावलंबन युडीआयडी कार्डचे (UDID card) वाटप जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी रवींद्र परदेशी (Ravindra Pardeshi) यांच्या हस्ते करण्यात आले…

जिल्हा समाज कल्याण कार्यालय (दिव्यांग विभाग) जिल्हा परिषद नाशिक कार्यालयाकडे एकूण 4563 स्वावलंबन युडीआयडी कार्ड प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकूण 3000 कार्डचे वाटप करण्यात आले आहे. पुढील काळात तालुकानिहाय पंचायत समित्यांमार्फत तसेच दिव्यांग शाळांमार्फत उर्वरित स्वावलंबन युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

दिव्यांगांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत मिळणाऱ्या निधीतील पाच टक्के निधी मधून दिव्यांगांच्या कल्याणच्या योजना राबविल्या जातात. याची माहिती यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याबद्दल माहिती दिली.

कार्डबाबत शहरी भागातील दिव्यांगांनी महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत यांच्याकडे संपर्क करावा तसेच ग्रामीण भागातील दिव्यांगांनी ग्राम पंचायती व जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी या स्वावलंबन युडीआयडी कार्डचा उपयोग होणार आहे. तसेच बस प्रवास सवलत मिळण्यासाठी युडीआयडी कार्डची व दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत एसटी महामंडळाच्या संबंधीत तालुक्यातील डेपोत दिल्यावर डेपोमार्फत स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, सहाय्यक सल्लागार कैलास उईके, प्रबोधिनी ट्रस्टचे सचिव रमेश वैद्य आणि मुख्याध्यापक रमेश वाणी आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.