शहरात अडीच लाख आर्सिनिक अल्बम औषध गोळ्याचे वाटप
नाशिक

शहरात अडीच लाख आर्सिनिक अल्बम औषध गोळ्याचे वाटप

महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

सद्यास्थितीत जगात व नाशिक महानगरपालिका परीक्षेत्रात करोना या संसर्गित विषाणूजन्य साथी रोगाचा प्रार्दुभाव दिवसोदिवस मोठया प्रमाणात वाढत याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुचित केल्यानुसार नाशिक शहरात अडीच लाख आर्सिनिक अल्बम -३० या होमिओपथी औषधाचे वाटप करण्यात आले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढीस मदत होऊन रुग्णवाढीचा दर कमी होण्यास सहाय्य होत असल्याची माहिती महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली.

महापालिकेकडुन करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी केल्या जात असलेल्या कामांची माहिती देतांना महापौर म्हणाले, ६ विभागाचे नोडल ऑफिसर व विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कस्, स्वयंमसेवक यांच्या मार्फत आर्सिनिक अल्बम -३० घरोघरी पोहचविण्याचे उदिष्ट आहे. तसेच जनजागृतीचा भाग म्हणून माहिती पत्रक देण्यात येत आहे.

आजपर्यंत सर्व साधारण पणे नाशिक शहरात व उपनगरात दोन लक्ष पन्नास हजार गोळयांचे वितरण करण्यात आलेले आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी १२०० ते १५०० आरोग्य तपासणी होत आहेत. गेल्या १३ दिवसांमध्ये २९ हजार १९५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून यात ३ हजार ३७९ पॉझिटीव्ह व्यक्ती आढळल्या आहेत. नाशिक शहरात कोव्हीड- १९ च्या अनुशंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपा शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरु आहे.

या सर्वेक्षणात शहरातील नागरीकांचे तापमान मोजणे, ऑक्सीजन व पल्सरेट मोजणे, कुंटूंबातील सर्व सदयांची खोकला, दमा, रक्तदा, मधुमेह, अस्थमा, क्षयरोग, किडनी आजार, तसेच अंथरुणावर खिळलेल्या रुग्णाबाबत तसेच गरोदर माता , इतर आजार व ह्रदयरोग आदी आजारासंबधी विचारली जात असून याची नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नोंद केली जात आहे.

महापालिकेच्या ३० शहरी आरोग्य केंद्रासह विभागनिहाय पथके तयार करणेत आली असून याकरीता नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील ६०० शिक्षकांची हृदयरोग, मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या गुतागंत असलेले ( कोमॉर्बिड ) रुग्ण शेधण्याच्या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आली असल्याचेही महापौरांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com