नदी संवर्धनातून सांस्कृतिक, पर्यटन विकास साध्य

जागतिक पर्यटन दिनी पोलीस आयुक्तांच्या हस्ते पर्यटन मित्र पुरस्कारांचे वितरण
नदी संवर्धनातून सांस्कृतिक, पर्यटन विकास साध्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय संस्कृतीचा उगम हा नद्यांच्या खोऱ्यातून झालेला दिसून येतो. नाशिक जिल्हादेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे नद्यांच्या संवर्धनातून पर्यटनाची संवर्धन संकल्पना राबविल्यास सांस्कृतिक आणि पर्यटन विकास ही दोन्ही ध्येय साध्य होतील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी केले आहे...

आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourism Day) जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन सभागृह येथे पर्यटन परिसंवाद व पर्यटन मित्र पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाण्डेय बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशासन भीमराज दराडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितिनकुमार मुंडावरे, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, टॅनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांच्यासह नाशिक पर्यटन विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पोलीस आयुक्त म्हणाले की, सर्व समावेशक विकासासाठी पर्यटन (Tourism) या संकल्पनेवर आधारीत यावर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे.

पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवरदेखील परिणाम करते. या अनुषंगाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची ख्याती सर्वदूर पसरविण्यासाठी नागरिकांचे योगदान ही महत्वाचे आहे. आपल्या जिल्ह्याला धार्म‍िक, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे.

गोदावरी नदीच्या (Godavari River) माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यास्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून प्रचार व प्रसिध्दी करण्यावर पर्यटन विभागाने भर द्यावा, असेही पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन विभागाचे उपसंचालक नितिनकुमार मुंडावरे म्हणाले की, जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

करोना (Corona) कालावधीत पर्यटनाचा विकास मंदावला होता परंतू आता नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औद्योगिकदृष्ट्या तसेच ॲग्रो टुरिझम आदींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे.

यांचा झाला सन्मान

 • ट्रेकिंग गाईड व लेखक रोहित जाधव,

 • कृषि पर्यटक व मधुमक्षिका पालन केंद्र चालक संजय पवार,

 • पर्यटन छायाचित्रकार व पर्यटन माहिती संकलक योगेश चव्हाण,

 • हॉटेल चालक व सम्राट गृपचे चेअरमन सुजॉय गुप्ता,

 • उत्कृष्ट पर्यटन स्थळ मंगळग्रह सेवा संस्थान अंमळनेर,

 • निसर्ग पर्यटन व आदिवासी भागातील पर्यटन वृध्दीसाठी कार्य करणारे नीलिमा जोरवर,

 • निवास व न्याहरी योजनाधारक शामली चौधरी,

 • वाईनरी चालक प्रदीप पाटील व संजय कहांडळ,

 • पर्यटक मार्गदर्शक रघुवेंद्र कुमार,

 • शांतीकृष्ण म्युझिअम ऑफ मनी हिस्ट्री कॉईन म्युझिअम,

 • पर्यटन स्थळांचे शिल्पकार बालाजी वल्लाल,

 • कृषि पर्यटन केंद्र चालक प्रभाकर साळवे,

 • ट्रॅव्हल्स् एजंटस असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे.

Related Stories

No stories found.